November 2, 2026 5:52 pm

मंगनाळी जिल्हा परिषद शाळेत स्वयंशासन दिन..शालेय व्यवस्थापन समितीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

      1. सिद्धेश्वर मठपती-मुख्य संपादक

धर्माबाद तालुक्यातील मंगनाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मारुती कागळे, गटशिक्षणाधिकारी मरकंटे साहेब, केंद्रप्रमुख उष्कलवाड, शाळेचे मुख्याध्यापिका सौ वैशाली विवेक स्वामी, सहशिक्षिका सौ वंदना देवधर, यांच्या मार्गदर्शक हा निदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन साजरा करीत एक दिवशीय शाळेचे सर्व सूत्रे हाती घेत दिवसभर शाळा चालवत शाळा शिकवण्याचा अनुभव घेतला. या स्वयंसाचे दिनाचे इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा ज्ञानेश्वर कागळे, तर उपमुख्याध्यापक श्रेया अनिल पुजरोड, त्याचबरोबर विद्यार्थी शिक्षक दुर्गा मल्लू अडकेकर, लक्ष्मी ज्ञानेश्वर मॅकलवाड, अक्षरा पोशटी मादनवाड, तेजस लालू, शिवम संभाजी, सेवकाच्या भूमिकेत प्रसाद पोशटी यांनी उत्तमरीत्या पार पाडली तर वरील विद्यार्थी शिक्षकाच्या भूमिकेत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना अध्ययन करत दिवसभर सर्व शासकीय कामाची मुख्याध्यापक व शिक्षकाकडून व शिक्षकाकडून माहिती घेत उत्तमरीत्या वर्ग चालवले, सदरील सर्व विद्यार्थ्यांचे अध्यापन करीत असल्याचे मुख्याध्यापकांनी निरीक्षण केले.मंगनाळी येथे असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आम्ही चालू आमची शाळा या उपक्रमांतर्गत येथील मुख्याध्यापक सौ. वैशाली विवेक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली 21 जानेवारी रोजी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा दिवसभर चालवत विद्यार्थी अध्यापन करत स्वयंशासन दिन साजरा करण्यात साजरा केला…

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें