- •हसनाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.• या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, लोकगीत तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. •यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून देशप्रेमाची भावना व्यक्त केली.
•प्रथमच हसनाळी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
• शाळेच्या सांस्कृतिक उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांचे समस्त हसनाळी ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
•या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. मारोती शंकर कावडे यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. योगिता हानमंत किरोळे, हसनाळी नगरीचे पोलीस पाटील श्री. संजय कावडे, उपसरपंच श्री. योगेश कावडे, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष श्री. हनमंत किरोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
•गावातील मान्यवर, पालक व ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पारला.
*संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा आमच्या वेद न्यूज मराठी चैनलने घेतला मुख्य संपादक सिद्धेश्वर मठपती.*








